SHARE

Tuesday, March 3, 2015

उठ धनगरा जागा हो आरक्षणाचा धागा हो!



 चलो मुंबई,चलो मुंबई
महाराष्ट्रातील धनगर
समाजाचा आरक्षणा चा प्रस्ताव त्वरीत
दिल्ली ला पाठवून ST आरक्षण लागु करावे
या मागणीसाठी दि 18 मार्च 2015
रोजी महाराष्ट्र धनगर समाज
महासंघाचा मुंबई विधानभवना वर धडक
मोर्चा.
या मोर्चाचे नेतृत्व मा.आण्णासाहेब
डांगे ,आमदार रामहरि रूपनवर ,आमदार
रामराव वडकुते,मा प्रकाश शेंडगे करणार
आहेत .तरी महाराष्ट्रातील तमाम धनगर
बांधवानी मोठया संखेने उपस्थित रहावे.
उठ धनगरा जागा हो,आरक्षणाचा धागा हो.
।।जय अहिल्या जय मल्हार।।
।।यशवंत सेना पुणे —


आरक्षणाचं नाव काढलं की मला भयंकार राग येतो. माझ्या तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते.
अरे कोणासाठी आरक्षण पाहिजे?? कशासाठी पाहिजे?? याचे फायदे काय? सत्ताधारी लोकं आपल्याला आरक्षण का देत नाहीत?? आदीवाशी लोकं याला का विरोध करतात??
हे सर्वसामान्य धनगर बांधवांसाठी माझे प्रश्न आहेत. त्याव्यतिरीक्त धनगर समाजातील नेते आरक्षणासाठी आंदोलने मोर्चे का करताहेत?? जर त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच झटायचं आणि झगडायचं असेल तर ते एकत्रित का येत नाहीत?? प्रत्येकाच्या खाद्यावर वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा कसा काय?? धनगर नावाची जमात एकच आहे की अनेक आहेत?? जर एकच धनगर समाज असेल तर मग नेते वेगवेगळे कसे काय?? धनगर समाजासाठी आणि आरक्षणासाठी लढायचं असेल तर समाजाचं विभाजन कशासाठी करताय??? या सर्वांची उत्तरं जर प्रत्येक समाजबांधवाला देता येतील त्यादिवशी आपण आरक्षणाचे मानकरी असणार हे मात्र निश्चित.
असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालून बसलेत. पण हे प्रश्नच ज्याच्या डोक्यात येत नाहीत त्यांना उत्तरं तर कोठून सापडणार??? हा देखिल सर्वात मोठा प्रश्न म्हणावा लागेल.
अरे आपल्या आया-बहीणी उन्हातान्हात थंडी वारा पाऊस यांचा विचार न करता माळरानावर डोंगर-दर्यातून दगड-धोंडे काटे-कुटे तुडवत आयुष्याशी झगडत होत्या आणि आजही तीच परिस्थिति आहे. तरीपण या सर्व गोष्ठींचा न करता त्याच आपल्या आया-बहिणी भर पावसात आरक्षणासाठी रस्त्यावरवर उतरल्या होत्या.
का झालं असं?? का आपल्या आया-बहिणींना देखिल संघर्ष करावा लागतोय?? 
मग आपण भिक मागतोय की आपल्या हक्काचं आरक्षण मागतोय हेच मला समजेना.
धनगर समाज आरक्षण कृती समितीमधील सर्वच नेत्यांना माझी एक चपराक आहे की आपल्या माझ्याच आया-बहिणी रस्त्यावर उतरल्या होत्या याची जाणीव तुम्हाला असून देखिल आज तुम्ही थंड का?? सत्ता मिळाल्यावर १० दिवसात आरक्षण देतो म्हणनार्या फडवणवीस ला ११ व्या दिवशी तुम्ही जाब विचारायला का गेला नाही?? आरक्षणासाठी रस्त्यावर उतललेल्यांपैकी त्यात तुमच्या कोणी आई-बहिणी नव्हत्या का? आणि जर त्या तुमच्या आई-बहिणी असतील तर आज तुम्ही एवढे षंढ कसे काय झालात??
४ जानेवारी २०१५ रोजी नागपुर मध्ये धनगर समाजाचा मेळावा आयोजित केला होता मग फडण२० ने सांगितले होते की एका महिण्यात निर्णय घेणार मग त्या फडणवीस ला तिथंच का नाही की अगोदर झकमारायला १० दिवस सांगितले होते का?? जर एका महिण्यात निर्णय घेणार होता तर ४ फेब्रुवारी रोजी एक महिना झाला उद्या ४ मार्च ला २ महिने होतील. अजून कीती महिने मोजत बसायचं??
पाठीमागे उपाशी-तापाशी राहून मोर्चे आंदोलने केली, उपोषणे केली होती ते सर्व वासरलात का तुम्ही?? आपल्या आई-बहिणी रस्त्यावर उतरून आरक्षणाची भिक मागत होत्या हे पण विसरलात का तुम्ही?? कीती निष्ठूर झालात तुम्ही?? आर या पार म्हणून आरक्षणासाठी अख्ख्या महाराष्ट्रातील धनगर समाज एकत्रित आला होता मग मधूनच कसे काय विझलात???? काय दाखवून दिलं नेमकं तुम्ही?? हे प्रश्न मी तुम्हा सर्व धनगर समाजातील नेत्यांना अन बांधवांना देखिल विचारतोय यामध्ये धनगर समाजाच्या कोणत्याही नेत्याला टार्गेट केले नाही अन त्यांना समजावयला ते लहान तान्ही बाळं नव्हेत.
उद्या पुढे भविष्यात कधीही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही नेता नेतृत्व करेल पण त्या त्या नेत्यानं एकच गोष्ट लक्षात ठेवावी.
जर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर प्रस्थापित पवार पाटील ठाकरे फडणवीस याचे बुट चाटायचे सोडून द्या अर्थात त्यांची गुलामगीरी अन समाजाची दलाली चमचेगीरी बंद करुन तुम्ही कोणत्याही पक्षात काम करत असाल त्या त्या पक्षाला राजीनामा द्यावा. मग भाजप असो शिवसेना मनसे असो कोंग्रेस राष्ट्रवादी जनता दल, जन क्रांती असो अथवा शिवसंग्राम याव्यतिरीक्त छोट्या मोठ्या कोणत्याही संघटना असोत. त्या सर्व पक्षांना एक पत्रकार परिषद बोलावून तुम्ही राजीनामे द्या अन्यथा माझ्या धनगर समाजाचं नेतृत्व तुम्ही करू नका कारण तुम्ही त्या लायकीचे नसाल. आमच्या धनगर समाजातीलच तुम्ही औलादी असाल तर या ना एका पिवळ्या झेंड्याखाली मग महाराष्ट्च काय दिल्ली हादरवून सोडतो.
आपलाच एक समाजबांधव


@उठ धनगर जागा हो आरक्षणाचा धागा हो!
जय मल्हार!! जय अहिल्या!!!

             View my facebook profile:
                        Amol Devakate